Aim:

1.To provide information and engaging series of lecture and workshop for students.
2.To provide relevant information on education to prospective students to enable an informed choice.


Objective:

1.Provide engaging and interactive 1 -1:30 hour/s lectures base around current theme of research within the university.
2.Provide opportunities for participants and colleges to be made aware of other relevant outreach opportunities within the university.


स्मृती व्याख्यानमाला-२०१९

स्मृती व्याख्यानमाला २०१९ मा. खा. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारणाला समाज बदलाचे माध्यम मानून काम केलं. त्यांनी ग्रामविकास सहकार, सिंचन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम केले आहे. सहकार चळवळीला त्यांनी वेगळा आयाम देण्याचे काम केले आहे. जेव्हा देशात ग्रामीण भागात शिक्षणाबाबत फारसी चर्चा होत नव्हती तेव्हा डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खेड्यातील तरुणांचे शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी काम केले. त्यांच्या या कार्याचा गौरव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर मांडण्याच्या उद्देशाने प्रवरा मेडिकल ट्रस्टचे आर्ट्स कॉमर्स & सायन्स कॉलेजमध्ये २०१७पासून सुरू झालेल्या या व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक १६ डिसेंबर २०१९ रोजी प्रारंभ झाला. मुंबई येथील जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा पॅटर्न’ या विषयावर बोलताना ते म्हणाले की “हिंदुत्वाच्या मतपेढीवर वाढणारे शिवसेना,भाजप हे एकमेकांचे नैसर्गिक मित्र नसून ते एकमेकांचे नैसर्गिक शत्रू आहेत. कारण एकमेकांना संपविल्याशिवाय त्यांची वाढ अशक्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केले. मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी नागपूर येथील कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांचे ‘उत्तम शेती कनिष्ठ का झाली?’ या विषयावर आपले विचार मांडताना ते म्हणाले की “शहराच्या विकासासाठी खेड्याचे शोषण केले जात आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते शेतकऱ्यांच्या विरोधातच काम करते. शेतीचा विकास हा शेतकऱ्यांचे एकेरी उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव यावर अवलंबून आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये केले. बुधवार दिनांक १८ डिसेंबर रोजी श्रीगोंदा येथील डोमगाव मठातील समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांचे ‘समर्थांची सामाजिक शिकवण’ या विषयावर व्याख्यान पार पडले. “समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे रामराज्य आणावयाचे असेल तर सत्तेसाठी असलेले लाचार हिंदुत्व कामाचे नाही असे प्रतिपादन मोहनबुवा रामदासी यांनी केले.” गुरुवार दिनांक १९ डिसेंबर रोजी पुणे येथील जेष्ठ कवी नारायण सुमंत यांचे ‘वारी ते वारी’ या विषयावर व्याख्यान पार पडले. “आपल्या कृषीप्रधान देशात नवनवे सुशिक्षित गुलाम तयार करणारे शिक्षण दिले जात आहे, त्यामुळे आपली शिकण्याची आणि शिकवण्याची प्रेरणाच हरवलेली दिसते. दिशाहीन शिक्षणामुळे आगामी काळात सुशिक्षितांच्या आत्महत्या पाहण्याचे दुर्भाग्य आपल्या वाट्याला येऊ शकते अशी खंत जेष्ठ कवी नारायण सुमंत यांनी व्यक्त केली. व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी सोलापूरचे डॉ. शिवरत्न शेटे यांचे “शिवरायांच्या अपरिचित पैलू” या विषयावर झाले. “छत्रपती शिवाजी महाराजांनी उपजत ज्ञान असलेल्या क्षेत्रात योग्य मावळ्यांची निवड करून पदभार सोपविला. मावळ्याला जिम्मेदारी देणे त्यात त्यांच्या प्रयत्नांना दाद देणे, शब्दाला जागणे, व्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करणे असे अनेक प्रशासकीय पैलू महाराजांचे होते. असे प्रतिपादन शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी केले. व्याख्यानमालेच्या समारोपाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओंकार रसाळ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. रामदास कातकडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. मोहन परतवाघ यांनी केले. या व्याख्यानमालेसाठी शेवगाव शहरातील सर्व मान्यवर साहित्यिक मंडळी तसेच शेवगाव तालुक्यातील विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने या व्याख्यानमालेचा लाभ घेतला.

स्मृती व्याख्यानमाला अहवाल-२०१७

महाराष्ट्रातील प्रत्येक भागात विखे पाटील यांच्या जीवनातील कथा सापडतील. मा. खा. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्याचबरोबर ग्रामस्थ, गरीब शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करणे आणि त्यांचे दुःख कमी करणे हे विखे पाटील यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी होते आणि म्हणूनच हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर एका आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या जीवनाची जीवनगाथा मांडण्यासाठी मागील वर्षी स्मृती व्याख्यानमालेला सुरुवात झाली. आता हे दुसरे वर्ष आहे. सोमवार दिनांक १७ डिसेंबर २०१८ ते शुक्रवार दिनांक २१ डिसेंबर २०१८ या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले होते. व्याख्यानमालेचा प्रारंभ प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दिनांक १७ डिसेंबर रोजी ‘संत विचार वारसा आणि वर्तमान’ या विषयावर संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे पार पडले. “संतांचे विचार अंगीकारून त्यांचा वारसा आणि आजची वर्तमान स्थिती यासंबंधी आपण विचार करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. १८ डिसेंबर रोजी ‘हवामान बदल आव्हान आणि आवाहन’ या विषयावर डॉ. अतुल देऊळगावकर यांनी “हवामाना संदर्भातील बदल तसेच येणारे आव्हाने यासंबंधी आपण जागरूक राहावे असे प्रतिपादन केले.” दिनांक १९ डिसेंबर रोजी ‘शिक्षणाचे राजकारण’ या विषयावर जेष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे बोलत असताना त्यांनी “आज शिक्षणाचे झालेले बाजारीकरण आणि त्यातच राजकारण हा मुद्दा मांडून येणाऱ्या काळात सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.” २० डिसेंबर रोजी ‘मन करा रे प्रसन्न’ या विषयावर पुणे येथील अधिष्ठाता प्रा.डॉ. संदीप लोखंडे यांचे व्याख्यान पार पडले होते. त्यांनी देखील “आजच्या काळात माणूस भरकट चालला आहे, पैसा हेच जणू सर्वस्व तो मानत आहे आणि त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये मध्ये सुखी राहून आपले मन प्रसन्न करावे असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. समारोपाच्या दिवशी म्हणजे २१डिसेंबर रोजी ‘लोकशाही आणि रामराज्य’ या विषयावर मुंबई येथील अँड. असीम सरोदे यांचे व्याख्यान पार पडले. या पाच दिवसीय व्याख्यानमालेस शेवगाव तसेच शेवगाव तालुक्यातील अनेक मान्यवर तसेच ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने व्याख्यानमालेचा पाच दिवस लाभ घेतला.

स्मृती व्याख्यानमाला अहवाल-२०१८

शैक्षणिक वर्ष २०१७ मध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकासात आणखी एक मोलाची भर पडली ती स्मृती व्याख्यानमालेची! शिक्षण हे उत्कर्षाच्या इमारतीचा पाया आहे आणि साक्षरता ही ज्ञान भंडाराची चावी आहे हे जरी खरे असले तरी वाचता-लिहिता येणे म्हणजे खरे शिक्षण होय. जेव्हा देशात ग्रामीण भागात शिक्षणाबाबत फारसी चर्चा होत नव्हती तेव्हा मा. खा. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खेड्यातील तरुणांचे शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी काम करीत खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाचे प्रारूप साकारले. त्यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या कामाचा आलेख सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या मनात असणारी तळमळ विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, तसेच विद्यार्थ्यांनी देखील त्यांचे गुण आत्मसात करावे या हेतूने मा. खा. डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे प्रथमतः आयोजन शनिवार दिनांक १६ डिसेंबर २०१७ ते बुधवार दिनांक २० डिसेंबर २०१७ या कालावधीत सायंकाळी ०५:०० ते ०७:३०वा. या वेळेत करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन शनिवार दिनांक १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ०५:०० वाजता प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते व श्रीमती शकुंतला माधवराव नरवडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले होते.पहिल्या दिवसाचे पुष्प साम टीव्ही चे संपादक संजय आवटे मुंबई यांच्या ‘भारत नावाच्या देशाची गोष्ट’ या विषयावर गुंफले गेले. “देशाची अखंडता टिकून राहण्यासाठी भौगोलिक सलगता भाषा,जाती,धर्म यांच्यातील समानता असणे आवश्यक असते. मात्र भारताने या सर्वांच्या विभिन्नतेतही एकता टिकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. देश नैतिकतेच्या मूल्यावर भक्कम उभा असल्यामुळे आजपर्यंत दुभंगला गेला नाही असे वक्तव्य साम टीव्हीचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले. दुसरे पुष्प रविवार दिनांक १७ डिसेंबर रोजी गिर्यारोहक तथा शिवचरित्र अभ्यासक सोलापूरचे डॉ. शिवरत्न शेटे हे ‘शिवराय आज असते तर...’ या विषयावर गुंफले गेले. “दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी छत्रपती शिवरायांची रणनीती अमलात आणायला हवी. गुन्हे घडू नयेत म्हणून शिक्षा कठोर हवी तसेच शेतीमालाचे भाव ठरविण्याचे अधिकार शेतकऱ्यालाच असायला हवे तर शेतकरी आत्महत्या होणार नाही अशी छत्रपतींची नीती होती असे प्रतिपादन डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी केले. तिसरे पुष्प सोमवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ०५:०० वा. संत साहित्याचे अभ्यासक विद्यावाचस्पती जेष्ठ प्रबोधनकार रामचंद्र देखणे यांचे ‘महाराष्ट्राची लोककला आणि प्रबोधन’ या विषयावर बोलत असताना “महाराष्ट्रातील लोककलावंतांनी समाज प्रबोधनही केले त्यांच्या योगदानामुळेच इथली भाषा आणि भूमी सकस झाली आहे असे प्रतिपादन जेष्ठ प्रबोधनकार रामचंद्र देखणे यांनी केले. तसेच मंगळवार दिनांक १९ डिसेंबर रोजी विनोद शिरसाट संपादक, साप्ताहिक साधना पुणे, यांचे ‘आजची राजकीय परिस्थिती एक संपादकाच्या नजरेतून’ या विषयावर झाले. लोकशाही शासन प्रणालीत एक हाती सत्ता आल्यास त्या शासनाची वाटचाल हुकूमशाही शासनाकडे होत असते. अशी सत्ता संसद, शासन आणि प्रशासनावर दबाव आणून सत्तेचे केंद्रीकरण करतात. यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर जनतेला प्रसारमाध्यमे आणि आंदोलन चळवळींना बळ देण्याचे काम करावे लागेल असे प्रतिपादन जेष्ठ संपादक विनोद शिरसाठ यांनी केले. तर या व्याख्यानमालेचा समारोप बुधवार दिनांक २० डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील कम्युनिस्ट विचारवंत डॉ. भालचंद्र कांनगो यांनी ‘भारताच्या आर्थिक विकासाचे वास्तव’ या विषयावर बोलताना ते म्हणाले की “विकासासाठी लोक नाही तर लोकांसाठी विकास या मूल्यांचा विसर होत आहे. देशासाठी विकास हा सर्व क्षेत्रात होणे आवश्यक आहे. मानव केंद्रित विकास हे भान ठेवायला हवे असे प्रतिपादन जेष्ठ कम्युनिस्ट विचारवंत डॉ.भालचंद्र कानगो यांनी केले. या व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओंकार रसाळ यांनी केले. तर आभार प्राध्यापक रामदास कातकडे यांनी केले या व्याख्यानमालेस शेवगाव सह शेवगाव तालुक्यातील सर्व विद्यार्थी व श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.